Friday 22 December 2017

खरा तिरंगा...

नही ना सोचते..
कौन है भूखे पेट सोचता..
मग का विचार करता..
कौन पढता है ' कुरआन '..
आणि कोण वाचतो ' गीता '..

कभी सोचते हो..
किसको नही मिलती रोजी-रोटी..
मग का विचार करता..
कौन पढता है ' नमाज '..
आणि कोण करतो ' आरती '..

नही सोचते ना भाई..
कसा जमवताय गल्ला..
मग का विचार करता..
कोण म्हणतो ' ईश्वर '..
और कौन कहता है ' अल्ला '..

बस झालं भाई..
आता दिमाग रखो थंडा..
मत सोचो आता..
किसके सर है ' टोपी '..
आणि कोणाच्या हाती ' झेंडा '..

बस इतनीसी है इच्छा..
प्रत्येक माणूस असू दे सच्चा..

एक दिवस असा येऊ दे..
जेव्हा नसेल कोणी ' भगवा '..
और ना होगा कोई ' हरा '..
' भगवा ' , ' हिरवा ' एकत्र येतील ..
आणि होईल मग  ' तिरंगा ' खरा...

                                            -- अंतरा...
                                     ( कश्ती सलिम शेख .)


Thursday 14 September 2017

तुझ्यासाठी...

हृदयाच्या प्रत्येक ठोक्याबरोबर..फक्त तुलाच स्मरावं...
आणि माझ्या हर एक श्वासात..फक्त तुझंच नाव उरावं...

तुझ्या एका नजरेनेही..माझ्या नजरेने लाजावं...
तुझ्या फक्त हसण्याने..पैंजण पायातलं वाजावं...

तुझं नाव मी..माझ्या तळहातावर जपावं...
ओठांवर माझ्या..नेहमी तुझंच गीत असावं...

तुझ्या तसविरीशी बोलताना..मी स्वताला विसरावं...
तुला माझ्यात जपता जपता..मीच तुझ्यात हरवावं...

तुझ्या आठवणीत मी..रात्र रात्र जागावं...
अश्रू होऊन आठवणींनी..अलगद गालावर उतरावं...

आस मनी हीच आता..तुझा हात धरुन आयुष्य चालावं...
तुझ्या मिठीत असतानाच..डोळ्यांनी कायमचं मिटावं...

                                                    -- अंतरा...
                                            (  कश्ती सलिम शेख. )