Wednesday 11 September 2019

निशब्दता....

न सुचणं म्हणजे अस्त वाटतो लेखणीच्या अस्मितेचा...काहीतरी सतत खात राहतं आतल्या-आत...मन विषण्ण होतं...
विचारांचं विवर खेचून घेतं आतल्या-आत..
नसतोच कुठेही कवडसा आशेचा..
त्या काळाशार विवरात प्रतिभेचा दिवा घेऊन चाचपडताना ठेचकाळतो पाय कुठेतरी 'घुसमटलेल्या भावनांना'...
सावरायला आधार घ्यावा तर कानांवर भस्सकन आदळतो आक्रोश..'अबोल व्यथांचा'...आणि धस्स होतं काळजातं...
आणि हो..हो.....नजरेला नजर भिडवून बघत असतात बरं 'मोडकळीस आलेली स्वप्न'...
नजर घ्यावी चोरुन पटकन आणि वळावं मागे..तर दृष्टीस पडतात 'विरक्त झालेल्या महत्वाकांक्षा'...कोपऱ्यात निपचित पहूडलेल्या...
कुठेतरी खोलवर...नकळत स्पर्श करुन जातात..'अताशा क्षणभ्रंगुर वाटू लागलेल्या आशा'....
अस्वस्थ होतात पाऊलं...त्या मळलेल्या वाटेवर...
घट्ट दाबून..कोंडून ठेवलेला अश्रुंचा बांध फुटतोच अखेर....
आणि त्या अश्रुंच्या धुक्यात डोळ्यासमोर नाचत राहतात...
'चुकलेले संदर्भ'..'विस्कटलेले अर्थ'..'हिरमुसलेल्या संवेदना'...'जीर्ण झालेली बेभान जिद्द'...'मन' सापडतं पुन्हा अनोळखी प्रश्नांच्या कचाट्यात...पुन्हा उडतो थरकाप...केविलवाणं धडपडतं‌ त्या काळोख्या विवरातून बाहेर येण्यासाठी....
मन पुन्हा होतं विषण्ण...आणि सरते शेवटी उरतो फक्त 'मरणासन्न कोरा कागद'...आणि 'जिवघेणी निशब्दता'.....

      -- अंतरा..
( कश्ती सलिम शेख)



Friday 24 August 2018

बोलो ना...


बोलो  ना..
क्या वैसे ही जिद करते हो तुम उससे भी आँखे मिलाने की..जैसे मुझसे किया करते थे...
क्या वो भी वैसे ही नजरे चुराती है तुमसे..जैसे मैं चुराया करती थी...

बोलो ना...
क्या वैसै ही फिक्र करते हो तुम उसकी भी...जैसी मेरी किया करते थे...
उन सर्द रातोंमे... वो भी वैसे ही जागती है क्या रातभर फिक्र मे तुम्हारी...जैसे मैं जगा करती थी....

क्या वैसै ही चिढते हो उसे गैरो के साथ देखकर...जैसे मेरे ऊपर चिढा करते थे...
बोलो ना..
क्या वो भी वैसे ही मनाती है तुम्हे रो-रो कर...जैसे मैं मनाया करती थी...

क्या वैसे ही बोल दिया करते हो  उसे भी उसके दर्दमे..."मै हूँ ना"..जैसे मुझे बोला करते थे...
क्या वो भी समेटके अपने सारे गम हँसाती है  तुम्हे...जैसे मैं हँसाया करती थी..
बोलो ना....

क्या  देर रात , वक्त -बेवक्त अब उसे मनाते हो जैसे मुझे मनाया करते थे...
बोलो  ना...
क्या वो भी पिघल जाती है तुम्हारी इश्क भरी बातो मे...वैसेही जैसे  मै पिघल जाया करती थी...

क्या उसे भी बता देते हो ..अपनी वो सारी बाते...सारी गलतीयाँ..जो सिर्फ मुझे बताया करते थे...
क्या वो भी दफना देती है सारे राज तुम्हारे..जैसे मैं दफनाया करती थी...
बोलो ना...

उसके हातो पे सजा है क्या अब वो रंग जो मेरी मेहंदी पर हुआ करता था..
बोलो ना..
क्या ठहर जाती है तुम्हारी नजरे उसके चेहरे पर वैसेही जैसे मेरे चिन के तिल पर ठहर जाती थी...

क्या चूप हो जाते हो उसके सवालोंपे वैसेही...जैसे मेरे सवालों पर सहम जाते थे...
क्या अब उस से करते हो वो आधीसी मोहोब्बत...जो कभी मुझसे किया करते थे...
बोलो ना..

खैर छोडो ये सब बात...
बस इतना बता देना...
क्या याद है वो सहमी हुयी रात...
जब मैनै तुमसे रोते हुये कहाँ था..."बस मुझे कभी भुलना मत"...
और तुमने सांस भी ना लेते जवाब दिया था.."कभी नही"...
क्या भूल गये अब...
बोलो ना....

                                                --  अंतरा ...
                                           (कश्ती सलिम शेख.)


Sunday 1 July 2018

चिता स्वप्नांची..

ती बाहेरच फेकली गेली चौकटीच्या..साचेबंद ध्येयाच्या तुरुंगातील अंधारवासाची शिक्षा नाकारली तिने म्हणून...इथल्या जळत्या जबाबदारीच्या ज्वालामुखीत आशा सुद्धा सुकून गेल्या तिथे स्वप्नांची काय कथा..मिणमिणत्या स्वप्नांच्या पणत्यांनी आयुष्य उजळून टाकण्यास निघाली होती ती...पण जबाबदारी च्या मशालीने स्वप्नांची चिता पेटवली जाईल याचा अंदाज कधी आलाच नाही.. भस्म झालेल्या स्वप्नांची राख जपत ती जळते अजून ...विखुरलेल्या आशेसह...

                                                      -- अंतरा...
                                                 (कश्ती सलिम शेख.)
                                                    (विशेष आभार)
                                                         शिवाज्ञा


Friday 8 June 2018

'फितूर'

ती... एक शांत तिन्हीसांज... आकाशाच्या अंगणात ढग दाटून आले होते अन मनाच्या अंगणात तुझ्या आठवणी....  त्या आठवणींचं विवर खूप खोल आहे.... म्हटलं त्यात बुडण्याआधी सावरायला हवं... नाहीतर श्वास घुसमटण्याची भीती... नेहमीचीच.... म्हणून मग पायात चपला सरकवल्या आणि निघाले ... वाट नेईल तिथे.... त्या एकट्या वाटेसोबत मीही एकटीच....
           पण.... मी एकटी पडलेले 'त्याला' आवडलं नाही कदाचित... मला सोबत देण्यासाठी 'तो' ही आला.... 'त्याचं' आणि माझं नातं फुलवणारा तो मृदगंध सोबत घेऊनच...
            त्या अल्लड थेंबांचा तो हळुवार स्पर्श.... तळहातावर ओघळणारे टपोरे मोती घेऊन मी चालत राहिले.... वाट नेईल तिथे... पण... आता एकटी नव्हते.... सोबतीला 'तो' होता अन त्याच्यात रमलेली मी....
          कडाडणारी वीजही शांत झाली आमच्या एकांताच्या चाहुलीने.... उरला फक्त काळोख...  ती वाट... अन शांतता....
            त्या एकांतात मग 'तोही' बरसला बेधुंद... बेभान वाऱ्याच्या हातांनी केसांशी खेळणं... अलगद बटांमध्ये गुरफटून जाणं... आणि 'त्याचा' तो स्पर्श... मोहवणारा... रिझवणारा.... अंगावर शहारा उठवणारा.. हे सगळं पुन्हा नव्याने अनुभवत होते...
आणि.... अचानक... कुठूनशी आलेली ती मंद झुळूक.... सर्वांगावर रोमांच उभे करून गेली.... आणि त्याक्षणी... त्याक्षणी तुझ्या मिठीतली ऊब हवीहवीशी वाटली.... पुन्हा तू... तुझी आठवण.... सावरण्याचे प्रयत्न करूनही बुडून गेले... तुझ्या आठवणींच्या विवरात....
           समजून चुकले.... कदाचित 'तोच' तुला 'फितूर' झाला....

                                                       -- अंतरा..
                                                ( कश्ती सलिम शेख.)
                                                  (   विशेष आभार  )
                                                         शिवाज्ञा..


Tuesday 23 January 2018

स्पर्शखुणा...

माझ्या ओल्या सांजवेळा..तुझ्या मिठित रुजाव्या..
त्या नभाच्या कुशीत..जशा चांदण्या निजाव्या..

तुझ्या डोळ्यात पाहता..यावी गालावरी लाली..
जशा पहाटदवात..उगा कळ्या मोहराव्या...

तु हात हाती घेता..मी तुला बिलगावे..
त्या किनाऱ्याला जशा..धुंद लाटा बिलगाव्या...

तुझे साखरेचे ओठ..माझ्या ओठांना भिडता..
मंद श्वासांच्या लहरी..आसमंती दरवळाव्या..

फक्त तुझा नि माझाच वसावा इवलासा गाव..
मी प्रेमात भिजावे..प्रेमसरी बरसाव्या...

सूर्य भेटता जळासी..व्हावे शांत आसमंत..
सारे सरावे बोलणे..मागे स्पर्शखुणा उराव्या...

                                                     - - अंतरा...
                                               (कश्ती सलिम शेख.)


Monday 15 January 2018

प्रेमकविता...

तू समोर नसलास तरी..मनात तुझेच विचार पिंगा घालतात...
तू समोर आलास की..तुझे डोळे माझ्याशी बोलतात...

तुझ्या डोळ्यातली ती प्रित..तुझ्या शब्दांत मी शोधते...
परि शब्द मनातले तुझ्या..तुझ्या ओठांतूनच परततात...

माझेही शब्द मग..मुकेपणाच धरतात...
मुक्या भावना बघ मग..आसवांतून ओघळतात...

मग याच मुक्या भावना..कागदावर उतरतात...
आणि आपोआपच त्याच्या..प्रेमकविता होतात...
       
                                                     - - अंतरा...
                                             ( कश्ती सलिम शेख. )


Friday 22 December 2017

खरा तिरंगा...

नही ना सोचते..
कौन है भूखे पेट सोचता..
मग का विचार करता..
कौन पढता है ' कुरआन '..
आणि कोण वाचतो ' गीता '..

कभी सोचते हो..
किसको नही मिलती रोजी-रोटी..
मग का विचार करता..
कौन पढता है ' नमाज '..
आणि कोण करतो ' आरती '..

नही सोचते ना भाई..
कसा जमवताय गल्ला..
मग का विचार करता..
कोण म्हणतो ' ईश्वर '..
और कौन कहता है ' अल्ला '..

बस झालं भाई..
आता दिमाग रखो थंडा..
मत सोचो आता..
किसके सर है ' टोपी '..
आणि कोणाच्या हाती ' झेंडा '..

बस इतनीसी है इच्छा..
प्रत्येक माणूस असू दे सच्चा..

एक दिवस असा येऊ दे..
जेव्हा नसेल कोणी ' भगवा '..
और ना होगा कोई ' हरा '..
' भगवा ' , ' हिरवा ' एकत्र येतील ..
आणि होईल मग  ' तिरंगा ' खरा...

                                            -- अंतरा...
                                     ( कश्ती सलिम शेख .)